STORYMIRROR

Ramesh a Chavan

Others

3  

Ramesh a Chavan

Others

गरुड झेप

गरुड झेप

1 min
17

हरवू नको स्वार्थाच्या दुनियेत

नको परवा करू ही कुणाची

तोडून सारे मोह मायेचे बंधन

तू तयारी कर गरुड झेपेची!!१!!


प्रेम कर धेयप्राप्ती स्वतःवर

ओढ तुला ही विजय प्राप्तीची

सोडून पाठी सगळी लाचारी

तयारी कर तू गरुड झेपेची!!२!!


पदोपदी अडवतील तुला सारे

पण कास धर तू फक्त सत्याची

उद्याचा विजय आहे तुझ्या हाती

तू तयारी कर तू गरुड झेपेची!!३!!


कसली चिंता करतोस उद्याची

उभा रहा झटकून मरगळ मनाची

मनगटात भरुनी तू जोमाने बळ

तू तयारी कर तू गरुड झेपेची!!४!!


होतील आतुर स्वागतार्ह सगळे

माळ गळ्यात तुझ्याच विजयाची

यशाने हुरळून नको जाऊ असा

तू पुन्हा तयारी कर तू गरुड झेपेची!!५!!


Rate this content
Log in