STORYMIRROR

Ramesh a Chavan

Others

3  

Ramesh a Chavan

Others

निराशा

निराशा

1 min
10

कसली करतो उगाच चिंता

संपेल रे आजची ती निराशा

उद्याचा दिवस तुझाच आहे

मनात ठेव थोडीतरी आशा!!१!!


सुख दुःखाचा खेळ असा

जीवनी असाच चालू राहील

खचून तू जाऊ नकोस कधी

नवीन दिशा नक्की सापडेल!!२!!


आशेवर तू जगतो आहे आता

करून स्वतः जीवनाची दुर्दशा

जरी अंधारल्या चारी दाही दिशा

तरीही जगण्याची ठेव आशा!!३!!


आशा निराशेचा होऊन मेळ

होते जीवनाची कायमची घालमेल

समोर उभं आहे यशाचे क्षितिज

बघ सुख काय असते ते दिसेल!!४!!



Rate this content
Log in