अखेर शाळेची घंटा वाजली
अखेर शाळेची घंटा वाजली
कधी घेईन दर्शन
माझ्या शारदा मंदीराचे
असे झाले होते मनास
कधी येतील दिन भाग्याचे 1
कधी येईल तो दिन
टाकीन पाय वर्गात
जीवास लागलेली काहूर
उद्या आता शमेल मनात 2
केली रात्रीच तयारी
नको होण्यास उशीर
गणवेश ठेविला उशाशी
मन घालण्यास अधीर 3
उद्या भेटीन मैत्रीणींना
वाटे मनास आनंद भारी
का होत नाही सकाळ
गुरुजींशी भेट न्यारी 4
असता टाळेबंदी शिपाई
सदा खेदे विचारी मनाला
प्रेमाने कुरवाळीत घंटेला
उद्या ऐकवीन घंटा नादाला 5
अखेर आला तो दिन
मुले झाली सारी गोळा
घंटेचे नाद निनादला
किती वाटे तो अपूर्व सोहळा