प्रतिबिंबित रूप
प्रतिबिंबित रूप
1 min
16
थेंब जलाचे, दर्पणावरी
निहाळे त्यातच स्वरूप
जल बिंदू शिंपणाने
आला जीवास हरूप
मिळे गारवा क्षणिक
प्रतिबिंबित चेह-यावर
थेंबाची जमली गर्दी
स्मित हास्य मुखावर
पाहता पाहता भासले
अश्रू ओधळते गालांवर
प्रत्यक्षात चेहरा मात्र
शांत निश्चल खरोखर
