लोक काय म्हणतील
लोक काय म्हणतील
नको मनात विचार
करा, मनी जे उचित
लोक काय म्हणतील ?
नका विचारू खचित
सदा ऐकावे जनांचे
अशी म्हण ऐकीवात
पण करावे मनाचे
हेही आहे कथनात .
मत विचार ऐकणे
होते कामाला सुलभ
मिळे विचारांची माळ
नुरे शंकेचे मळभ
खरा ठरे तोची जगी
ऐकूनिया जगताचे.
लोक बोलेनात काही
स्वतः ठरवी स्वतःचे
व्यक्ती तितक्या प्रकृती
विचारात मतभेद
हवे तेवढे ऐकावे
नको मनी कदा खेद
