सद्य जीवनशैली
सद्य जीवनशैली
*स्पर्धेसाठी*जग झालय प्रगत
एक फोन केला तर
मिळे सारेची सहज
हवी वस्तू ती हजर
सध्या मित्रांची गणना
किती करावी, ती कमी
पण गरजेच्या वेळी
कामी येण्याची न हमी
बोलण्यास भेटण्यास
वेळ नसे कोणालाही
फोन वर संवादात
आनंदाची मजा नाही
दोन शब्द बोलायला
आजी आजोबा तृषित
एका घरात राहून
सदासाठी उपेक्षित
पुढे मागे मोठी बाग
असे घर शानदार
सुख उपभोग घेण्या
वेळ कोणा नाही फार
येती मनात विचार
असे आहे हेची सारे
*कटु आहे पण सत्य*
वरवर दिसे न्यारे
