STORYMIRROR

vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

सांगते एक गुपित

सांगते एक गुपित

1 min
5

जपलीय मनात मी

माझी पहिली कविता

अगणिक जरी रचल्या

तीच ठरली *गर्विता*


केले होते वर्णन तयात

माझ्या बागेतील फुलांचे

एका एका फुलांनी वर्णिले

महत्त्व आपापले स्वतःचे


लिहीली होती कन्येसाठी

भावली तिला अतिशय

सहज केली तिने तोंडपाठ

समजून घेऊन आशय


साध्या सोप्या शब्दात 

केली शब्दांची मांडणी

बालभारती पुस्तकासाठी

आली की हो! तिज मागणी


खुष होवूनी वाट पहातेय

फोन येईलच हो... खचित 

धाडा स्वपरिचया सह फोटो,

पण मनीच ठेवा हं गुपित  


 सा-या मम सख्या तुम्ही

 म्हणून *कथिले एक गुपित*

पण अजून हे गुपितच ठेवा

हेही सांगणे तितकेच उचित 


Rate this content
Log in