STORYMIRROR

Dr.Surendra Labhade

Children Stories Drama Thriller

4  

Dr.Surendra Labhade

Children Stories Drama Thriller

विटंबना

विटंबना

4 mins
318

वृद्धाश्रमाच्या दाराला आज पुन्हा लाज वाटली, 

सुशिक्षीत जोडपे ती कार्यालयात येऊन भेटली


विनंती केली त्यांनी आहेत का दोन जागा? 

म्हतारा म्हतारीचा आता घरात सोसवेना त्रागा


होकार कळताच किती सुखावली ती दोघे, 

हर्ष दाटला मनी हलके झाले ओझे


बिचाऱ्या माऊलीची नजर रस्त्याकडेच लागुन होती,

काहो अजुन हे दोघे आले नाही वेळ झाला किती?

  

ओसरीवरचा म्हतारा धीर देत होता, 

उशीर झाला असेल ग त्यांना औषधे आपली घेता


डोळ्यांत प्राण आणुन मायबाप वाट बघत बसले दारात,

दुर्लक्ष करून त्यांच्याकडे जोडपे घुसले घरात


आवाज आला घरातुन ठेवु नका दुबळी आस्था, 

वाट बघतोय तुम्हा दोघांची तो वृद्धाश्रमाचा रस्ता


आई वडील नात्याचे रेशमी बंधन त्याने तोडले, 

घरातील विठु माऊलीला वृद्धाश्रमात आणुन सोडले


विसरून गेला क्षणांत माय बापाच्या प्रेमाला, 

हिंदाळून पाडले होते त्याने सावली देणाऱ्या झाडाला


चालवु लागले दोघे मिळुन संसाराचे सुत्र, 

नवसाअंती प्राप्त झाला त्यांना एक पुत्र. 


जिवापेक्षा जपे त्यासी वाटे काळजाचा तुकडा,

क्षणोक्षणी आठवे त्यांना त्याचा सुंदर मुखडा


दिवसांमागुन दिवस लोटले बाळ बोले बोबड्या बोली,

आजीआजोबा कुठयं हो बाबा का रिकामी त्यांची खोली? 


सुंदर एक ठिकाण बाळा तिथे आहेत माझे मातृपित्र,

आनंदाने राहतात दोघे तिथे फार त्यांचे मित्र


हट्ट धरला बाळाने मला आजीआजोबा दाखवा,

सुंदर त्या ठिकाणी मला नेवुन भेटवा


हट्ट पुरविण्या बाळाचा घेवुन गेला वृद्धाश्रमात, 

थकलेले दोन जीव झोपले होते वनात


दाखवुन बोट त्यांकडे म्हणे ते बघ आजोबाआजी, 

किती आनंदाने झोपले बघ आईबाबा माझी 


आजीआजोबा उठा ना बोलली ती मंजुळ वाणी, 

हर्षुन उठले दोघेही आले नयनी त्यांच्या पाणी


अश्रु पुसत म्हणाला वाटत नाही का तुम्हाला बरं?

करमतं का हो आजीआजोबा तुम्हाला इथे खरं? 


हसुन म्हणाले बाळा इथे खुप बरं वाटतं, 

पिल्लं दुर गेले की बाळा असचं काळीज फाटतं


फाटलेली चटाई उचलत उठले ते दोघे, 

कवटाळुन छातीशी त्याला म्हटले खेळ खेळू मागे


फाटलेलं होतं लुगडं आजीचं उसवली होती चोळी,

हातपाय दुखे त्यांचे पण मिळत नव्हती गोळी


आजीआजोबांना बाबा घरी आपल्या घ्याना, 

छान सुंदर कपडे त्यांना पण द्याना


झाले का भेटुन तुझे चाल आता घरा, 

नादावला त्यांच्या संगे तु वेडा झाला खरा


मंदिर बघुन समोर बाळाने जोडले हस्त, 

क्षणभर डोळे मिटुन उभे राहिला तटस्थ


काय मागितलेस देवाकडे सांगशील का मला? 

हसत बघत बाळाकडे प्रश्न बापाने केला  


बाबा हात जोडून देवाला प्राथना मी केली, 

ह्याच सुंदर जागेत तुमची राहण्याची व्यवस्था केली


क्षणांत उतरला चेहरा त्याचा आला मना राग, 

हेच मागण्यापेक्षा आमचा मृत्यु तरी माग


जातो बोलून बाबांशी उचलोनी घेतले पुत्रा, 

ओघावत्याच नजरेने बघितले त्याने त्यांच्या नेत्रा


पुत्राची आठवून वाणी लागेना गोड पाणी, 

अनेक विचारांनी त्याच्या घर केले मनी  


अरे ज्या माऊलीने तुझ्यासाठी रक्ताचे दुध केले, 

मोठा होताच तु तिला नजरेआड केले


हृदयाशी कवटाळुन वेड्या तिने तुला गप्प केले, 

तु मात्र दृष्टा तिला हृदयातुनच दुर केले


अरे ठेच लागायची वेड्या तुला पण ती मात्र रडायची,

कितीतरी रात्र तुझ्यासाठी जागुन ती काढायची


दिवसरात्र कष्ट करून बापाने तुझ्यासाठी कमवलं, 

उभं आयुष्य त्याने तुझ्यासाठी गमवलं  


पावलोपावली ज्याने तुला विश्वासाची दिली थाप,

त्याच्याच पुण्याचे शेवटी तु काढलेस माप


झेलुन उनवारा ज्यांनी धरली तुझ्यावर सावली, 

विसरून गेला क्षणात तु ते बाप आणि माऊली


जसे करावे तसे भरावे विसरू नको जगाची रीत, 

अशीच वेळ उद्या तुझीही असेल समजु नको हे मिथ


ज्वर चढला अंगाशी झाला खुप पश्चाताप, 

हुंदके देवुन रडु लागला आठवले ते माय बाप


क्षमा मागुन आईबापांची चरणांवरती लोळला, 

बघुन पुत्राची दशा त्यांचा जीव पोळला


मायबापाचे नेत्र ते क्षणांत ओलेचिंब झाले, 

कवटाळून छातीशी त्यांनी त्याला माफ केले



Rate this content
Log in