फक्त जग म्हणा
फक्त जग म्हणा
'ओळखलत का तुम्ही मला’ उन्हात आले कुणी?
अंग आहे तापलेले मिळेना कुठे पाणी
आनंद आम्हा होतो फार पाऊस पडतो जेव्हा,
पंख फडकूनी तुषार उडवितो आम्ही पुन्हा पुन्हा
घरटी आमची मोडून जाई घुसते त्यात पाणी,
जिद्दीने पुन्हा घरटी बांधतो हीच आमुची कहानी
थंडी अशी धावूनी येते बसते अंगात जाऊनी,
काळीजही गोठून बसते स्पर्श तिचा जानूनी
तिचाही आम्हा रोष नसतो जरी अश्रू जाती गोठूनी,
नजर सदा शोधत असते मार्ग मिळेल कुठूनी?
क्षणभर बसतो नंतर उडतो शोधतो चारा पाणी,
नदी नाले सर्व आटले पाण्याची आणीबाणी
ऐकून पक्ष्यांची करुणवानी ओघळले डोळ्यांतून पाणी,
बघून दृश्य ते केविलवाणी पक्षी उडाले त्याचक्षणी,
अश्रू नकोत तुमचे जरा सहानुभूती दाखवा,
ठेवून पाणी ओसरीवरती जीव आमुचा वाचवा
मोडून गेली घरटी तरी दुखवले नाही कुणा,
चोचीत देऊनी पाणी आमच्या फक्त जग म्हणा
