विरह
विरह
पाणावले डोळे,
ओघळले आसू,
विचारी ते हृदयाला,
दुःख तुझे कसे सोसू?
हळवे ते हृदय,
बोले दुख माझे नको सोसू,
त्रास माझा ऐकूनिया,
आटतिल तुझे आसू.
जाते कुणी दूर,
तेव्हा का लागतोस धडधडू?
जलावाचून मछली,
जशी लागे तडफडू.
बघितलेला तु मुखडा,
आहे माझाच तुकडा,
विरह त्याचा मला सतावतो,
ओल्या होती तुझ्या कडा.
दुःख जर हे एवढे,
तर का धरावी त्याची आस?
स्वतःच्याच हाताने,
का लावावा गळफास?
हृदय म्हणतात मला,
प्रेमाचे मी असे गाव,
वास्तव्य माझ्यात केलेल्याच,
विसरत नाही मी कधी नाव.
जागा देतोस कुणाला,
तेव्हा ठेवतो ओठांवर हसू,
विरह त्याचा जेव्हा,
तेव्हा माझ्याच जागी आसू.
बोलतात जेव्हा ओठ,
नसते आश्रूंना काही वाव,
ठेच लागताच मला,
घेतो तुझ्याकडे धाव.
लावतोस किती जीव,
मग का खेळतोस लपंडाव?
व्यक्त कर प्रेम तुझे,
उमलुदे मनातील भाव.
मन कोडं आहे मोठं,
सोडविता सुटवेना,
शब्द झाले खूप जड,
ओठांना ते उचलेना.
हृदयाची धडपड,
आता नेत्रांना बघवेना,
केला आश्रुंचा अभिषेक,
दुःख त्याचे सोसवेना.
