STORYMIRROR

Shivam Madrewar

Drama Romance

3  

Shivam Madrewar

Drama Romance

मला सांग ना...

मला सांग ना...

1 min
333

वर्गात फक्त तुझ्याकडेच पाहत बसावे,

तू पाहण्याती मी तासनतास वाट पहावे,

तुझ्या डोळ्यांच्या नजरेत मला अडकव ना...

मझ्याकडे कधी पाहतेस हे मला सांग ना...


तु जिथे जाती तेथे मी मागोमाग यावे,

मनातच तुझ्या सोबत मी कॅाफी प्यावे,

एकदातरी तु मला भेटण्यासाठी ये ना..

कॅाफीकधी घेणार हे मला सांग ना...


भिंतींमागे मी मांजरासारखे लपून बसावे,

तुझा आवाज ऐकण्यासाठी तेथेच उभा रहावे,

तुझ्या शब्दांच्या स्वरामध्ये मला फसव ना...

तुझा आवाज कधी ऐकवणार मला सांग ना...


मैदानावरती ईकडे-तिकडे मी भटकावे,

तुझ्या पाऊलखुणांवरती मी पाऊल ठेवावे,

माझ्या पाऊलावरती पाऊल तु पण ठेव ना...

पाऊलवाटांनरती कधी चालू हे मला सांग ना...


रात्री माझ्या स्वप्नांमध्ये येऊन माझी झोप मोडावे,

झोप लागण्यासाठी पुन्हा मी तुझा आवाज ऐकावे,

रात्रभर तुझ्या आठवणींमध्ये मला झोपू दे ना...

परत कधी माझ्या स्वप्नात येणार हे मला सांग ना...


तुझ्या प्रेमातल्या कारागृहात मी बंदी व्हावे,

उरलेले जीवन देखील तुझ्याच सान्निध्यात घालवावे,

आता तरी तू मला काहीतरी बोल ना...

जीवनगाठ कधी बांधणार हे मला सांग ना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama