STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Drama Fantasy

3  

Ganesh G Shivlad

Drama Fantasy

होय माहीत आहे मला..!

होय माहीत आहे मला..!

1 min
333

होय माहित आहे मला,

गोड स्वप्न तुझे, ते रात्रीचे...!


नको तू सांगू, ते स्वप्न पुन्हा,

मीच होतो आलो रात्रीचे...!


हलवित होतो मी, झाड ते,

तू वेचित होतीस फुले...!


ओंजळ भरली, त्या फुलांनी,

तू वेचताना, ती फुले...!


भरून ओंजळ, ओटी भरली,

सुटला नाही, तुझा मोह...!


थकलो, हलवून झाड मी,

नाही संपला, तुझा फुल मोह...!


अन् अजूनही, हलवतो आहे मी,

ते संसार झाड, तुझ्या फुलांचे...!


तू अजुनही वेचते आहेस,

झाडाखाली त्या, सुख फुलांचे...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama