STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Fantasy Inspirational

4  

Ganesh G Shivlad

Fantasy Inspirational

पळसुला

पळसुला

1 min
3

स्वागताला वसंताच्या, उभा केशरी गं पळसुला…
रानो~रानमाळी बहरला माझा, केशरी गं पळसुला..!

गर्द हिरव्या पानातून, केशर कसा उधळितो…
नव्या कोवळ्या पालव्या, मायेने गोंजारीतो…
दमला भागला तो जीव, पाहुनी गं मोहरला..!
रानो~रानमाळी बहरला माझा, केशरी गं पळसुला..!

तळपत्या उन्हामधी कसा, डेरेदार उभा भला…
शांत शीतल छायेत, हर्ष उल्हास रानफुला…
भेगाळल्या त्या भुईला, आल्हाद आनंद गं झाला..!
रानो~रानमाळी बहरला माझा, केशरी गं पळसुला..!

रंग होळीचा संपला, उन्हं करती गाजावाजा...
पीक उभं कापणीला, शेतामध्ये बळीराजा...
उभा रखरख उन्हात, निश्चल गं केशरुला..!
रानो~रानमाळी बहरला माझा, केशरी गं पळसुला..!

सांज प्रभात समयी, पदर केशरी तो भुईचा...
तसा अंगा खांद्यावर त्याने, शेला ओढला मायेचा...
सांगे आदर्श मानवा, इसरू नको तू संस्कृतीला..!
रानो~रानमाळी बहरला, माझा केशरी गं पळसुला..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy