STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Action Inspirational Children

4  

Ganesh G Shivlad

Action Inspirational Children

उत्तरायण

उत्तरायण

1 min
19

उभे आयुष्य जगताना न उलगडलेली कोडी 
अचानक एकाएकी उलगडू लागतात, 
समजू लागतात, उमजू लागतात,
तेव्हाच सुरू होते जीवनातील 
उत्तरायण…

तारुण्यात भरकटलेले मस्तक ठिकाणावर येते,
केलेली नसती उठाठेव राहून राहून आठवू लागते, 
आणि केलेल्या चुका जेव्हा चुका वाटू लागतात,
तेव्हाच सुरू होते जीवनातील 
उत्तरायण…

आईवडील नको जाऊ म्हणाले होते पण…
पण तेथे गेलोच, गेलो आणि संपलो होतोच पण
वेळीच त्यांनी सावरले आणि त्यामुळेच मी येथे आहे,
असे जेंव्हा उमगण्यास सुरुवात होते,
तेव्हाच सुरू होते जीवनातील 
उत्तरायण…

आणि हे उमगलेले, उमजलेले, समजलेले,
आपल्या पुढच्या पिढीला सांगून सावध करावेसे वाटते,
आणि आपण केलेल्या चुका, त्यांच्या हातून होऊ नये,
असे मनातून वाटते, 
तेव्हाच सुरू होते जीवनातील 
उत्तरायण…


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action