माझी शाळा
माझी शाळा


आठवते मला माझी शाळा
पाळायचो खूप बंधन आणि वेळा
सुट्टी असेल जरी शाळेला
शाळेभोवती फिरायचो
अभ्यास सांगितल्यापेक्षा
नेहमी जास्त करायचो
दप्तराचं कधीचं
वाटल नाही ओझ
पाटी अन् पेन्सिल
एवढचं दप्तर माझं
मराठीच्या बाई
खूप सांगायच्या गोष्टी
हसत-खेळत शिकवायच्या
व्याकरण विभक्ती प्रथमा, षष्ठी
गणिताच्या तासाला
जमायची नाही आकडेमोड
खेळाचा तास मात्र
भारीचं वाटायचा गोड
इतिहासात आम्ही
भारीचं रमायचो
क्षणात आम्ही स्वप्नात
शिवबाभोवती जमायचो
इंग्रजांच्या इंग्रजीच
ी
खूप वाटायची भिती
व्याकरण अन् शब्द
पसारा तिचा किती!
विज्ञानाच्या तासाला
प्रयोगच प्रयोग
गुरुजी सागांयचे
विज्ञानाशिवाय नाही हे जग
भूगोल म्हणजे
असायची शैक्षणिक सहल
त्यात पाहिल्या वास्तु
लालकिल्ला, ताजमहल
परिक्षेची आम्हाला
कधीच वाटली नाही धास्ती
शाळा म्हणजे आमुची
खेळ, मौज मस्ती
अशा माझ्या शाळेची
आठवण येते खूप
वाटतं पुन्हा व्हावं लहान
मिळावा पुन्हां विद्यार्थी
होण्याचा मान.
अशी आमुची शाळा
म्हणजे आनंदाचा मेळा
शिस्त असायची खूप
कोरा नसायचा फळा