STORYMIRROR

Ashvini Dhat

Others

3  

Ashvini Dhat

Others

भाऊबीज

भाऊबीज

1 min
13.7K




आज भाऊबीज

ओवाळीते भाऊराया

असते रे या वेड्या

बहिणीची ही वेडी माया


देवाकडे आहे

आज हेची मागणे

सुंदर सुखद व्हावे

तुझे जगणे


नाही रे तुझ्याकडून

ओवाळणीची आशा

प्रगतीने लाभू दे

तुझ्या जीवनास नवी दिशी


रक्षणास तू

श्रीकृष्णासारखा धाव

एवढाच आहे रे

प्रत्येक बहिणीच्या

मनी भाव


आदर तू

प्रत्येक स्त्रीचा करावा

असा हट्टहास प्रत्येक

बहिणीने धरावा


भाऊ बहिणीच्या नात्यांत

असावा मुक्ताई-ज्ञानेश्वरा

समान मायेचा ओलावा

भाऊबीजीचा हा सण

परंपरेने चालावा


वळावे असे पुन्हा पुन्हा

माहेराकडे पाऊल

लागता रक्षाबंधन,

भाऊबीजेची चाहूल


Rate this content
Log in