STORYMIRROR

Vijay Sanap

Drama

3  

Vijay Sanap

Drama

फटका

फटका

1 min
28.5K


वैभव सारे समीप असता उगाच भटकत फिरु नको

कशास करशी हाव माणसा रडत उगा तू बसू नको ।।


जन्म दिला तुज भगवंताने वाम मार्गी तो लावू नको

बहु मोलाचा वेळ तुझा रे उगाच वाया घालु नको ।।


नात्याचा कर विचार मनुजा स्वार्थासाठी भांडु नको

वेळ वाईट आली तेव्हा नीति आपली सोडु नको ।।


माझं माझं म्हणत सारं गर्व मनाशी करु नको

क्षणात जीवन सरुन जाईल आस उद्याची धरू नको।।


कर्म आपले ठेव चांगले उणे कुणाचे चितू नको

माय पित्याची सेवा कर तू आश्रमात पाठवू नको ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama