STORYMIRROR

Vgshjsksldv Gshshshs

Drama

3  

Vgshjsksldv Gshshshs

Drama

फरक अवघड सोप्याचा

फरक अवघड सोप्याचा

1 min
15K


कुणाची आठवण काढणं किती सोपं असतं,

पण कुणाला भेटायला जाणं किती अवघड असतं.


कुणाशी व्हॉटस्ॲपवर बोलणं किती सोपं असतं,

पण कुणाशी समोरासमोर बोलणं किती अवघड असतं.


कुणाला वाट पाहायला लावणं किती सोपं असतं,

पण कुणाची वाट पाहणं किती अवघड असतं.


कुणावर प्रेम करणं किती सोपं असतं,

पण कुणाच प्रेम जपणं किती अवघड असतं.


कुणाला सल्ले देणं किती सोपं असतं,

पण कुणाचे सल्ले घेणे किती अवघड असतं.


कुणाच्या चुका दाखवणं किती सोपं असतं,

पण कुणाच्या चुका लपवणं किती अवघड असतं.


कुणाचा विश्वास तोडणं किती सोपं असतं,

पण कुणाचा विश्वास जिंकण किती अवघड असतं.


कुणावर दात काढून हसणं किती सोपं असतं,

पण कुणाचे डोळे पुसणं किती अवघड असतं.


कुणावर रागावणं किती सोपं असतं,

पण कुणाचा राग अंगावर घेणं किती अवघड असतं.


कुणाला आपलंसं करणं किती सोपं असतं,

पण कुणाचं आपण होणं किती अवघड असतं.


कुणाशी नातं बनवणं किती सोपं असतं,

पण कुणाचं नातं स्वीकारणं किती अवघड असतं.


सगळ्या गोष्टी अवघड अवघड बोलणं किती सोपं असतं,

पण प्रयत्न करुन अवघड गोष्टी सोप्या करणं किती अवघड असतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama