STORYMIRROR

Vgshjsksldv Gshshshs

Inspirational Others

4.1  

Vgshjsksldv Gshshshs

Inspirational Others

आई, ताई, बायको

आई, ताई, बायको

1 min
4.7K


हे मला जन्म देणारी आई ,

हे माझी बाहुलीसारखी ताई,

हे माझी अर्धांगिनी.


कधी संपणार काम तुझी आई,

कधी संपणार छळ सासरी तुझा ताई,

कधी संपणार लग्नानंतर जग बदलण्याची प्रक्रिया बायको.


कधी संपणार २४ तासाची बिनपगारी, बिना सुट्टीची तुझी नोकरी आई,

कधी संपणार बलात्कार, विनयभंग, ॲसिड हल्ल्याची विकृती ताई,

कधी संपणार हुंडा परंपरा, वांजुटेपणाचा शिक्का बायको.


कधी स्वतःसाठी जगशील आई,

कधी तुझ्या माहेरी येऊन थोड मनमोकळे बोलशील ताई,

कधी तुझ्या माहेरी दिलखुलास वेळ देशील बायको.


मी मरेपर्यत तुझ छोट लेकरुच आहे आई

मी मरेपर्यत तुझ छोट बाळच आहे ताई

मी मरेपर्यत तुझा ह्रदयातला राजकुमार आहे बायको


तुम्ही तिघी आहात म्हणून

मी श्वास घेतोय

मी खूश आहे

मी सुखी आहे

मी समाधानी आहे

मी निरोगी आहे


कारण


मी नशीबवान पुरुष आहे या पृथ्वीवरचा.

त्याच श्रेय तुम्हा तिघांना


सर्व आई बहीणींना वहिणींना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुम्ही सर्व खूश राहा म्हणजे सगळे खूश राहतील.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational