STORYMIRROR

AKSHAY KUMBHAR

Others

3  

AKSHAY KUMBHAR

Others

माणसाचा शेवट

माणसाचा शेवट

1 min
503


का रे माणसा कसला आहे रे तुला घमंड


जन्माला आलास तेव्हा उघड शरीर घेऊन आलास तू

आणि

मरताना पण तेच उघड शरीर घेऊन मरणार तू


मग कशाला तो पैशाचा माज,

मग कशाला ती सत्तेची भूक,

मग कशाला त्या इज्जतीचा अहंकार,

मग कशाला कोणती गोष्ट न मिळाल्याची खंत,

मग कशाला यश अपयशाचा ताज,

मग कशाला जात, धर्म वर्णाच्या काळजावरच्या भिंती

मग कशाला ते विभिन्न नावाच ओझ,


एक गोष्ट विसरु नकोस माणसा तू


तू माणूस होतास

तू माणूस आहेस

आणि

तू माणूसच राहशील


कारण


तू या मातीतून आलायस

आणि

तू या मातीतच जाशील.



मग कशाला करतो दुखःचा कांगावा



विचार कर माणसा, विचार कर

कारण

जीवन खूप छोट आहे

आणि

तुझ माणुसकीच कार्य खूप मोठ आहे.


दुखः हे मोफतच भेटेल 

पण सुखः विकतच घ्याव लागेल.


तुझ कार्य हेच आहे माणसा

विकत घेतलेल सुख फुकट वाट

आणि 

मोफत घेतलेल दुखः विकत वाट

वाटल्याने सुखः वाढत जाईल

वाटल्याने दुखः कमी होत जाईल


एक वेळ अशी आली पाहिजे माणसा 

तू मरता मरता

दुखःचे सिक्के फक्त तुझाकडे राहिले पाहिजे

आणि 

सुखःच्या नोटा दुसऱ्याकडे राहिल्या पाहिजे


तुझी सुरवात तू ठरवू शकत नाहीस

पण तुझा शेवट हा फक्त तूच ठरवू शकतोस


जाग माणसा जाग

दुखःलापण आपलस कर 

म्हणजे 

फक्त

सुखःचा दानकरी बनशील

आणि

माणुसकीचा मानकरी बनशील.


बघ माणसा लवकर बघ

तुझा शेवट जवळ येतोय.



Rate this content
Log in