STORYMIRROR

Mangesh Medhi

Drama

3  

Mangesh Medhi

Drama

मी कविता

मी कविता

1 min
14.5K


पवित्र सात्विक ओवी मी

आत्मानंदी असा अभंग

भक्तीची आर्त-साद

माऊलींची ज्ञान गंगा

जात्यावर जनीच्या सांडले मी


नाचले नाथा संगे

तुकोबाची झाले गाथा

भारुडी मी रंगले

मळ्यातील माईची लेक मी

अन मायेची शिकवण


अदृष्यशी घुसमट !

अन अश्रृंना मोकळी वाट मी

उत्स्फूर्त ह्रुदयीची स्पंदने मी

भग्न मनाची व्यथा

प्रणयी बेधुंद आवेग


भाव भाबड्या लोचनीचे

बागडते अंगाखांद्यावर माझ्याच

बाल मन निरागस

सळसळत्या रक्ताचे कवन मी

रुप शौर्याचे बलीदानाचे


प्रेम ही माझ्या प्रेमात पडते

माझ्याच सवे मोहरते

योगेश्वरास ही मी भावले

धर्म युद्धी मज गायीले


होय तीच !, तीच ती !

मी कविता, मी कविता !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama