STORYMIRROR

Kakade Tejas

Drama Romance

3  

Kakade Tejas

Drama Romance

ती आणि मी...पहिली झलक

ती आणि मी...पहिली झलक

2 mins
285

भेटलो दादाच्या लग्नात,

पाहिलं मी तिला तिनं मला,

सुंदर दिसत होती फार ती,

आईशप्पथ सांगतो,

तिचे डोळे काय डोळे होते तिचे,


पाहतचक्षणी कोणाच्याही मनाला भुरळ घालतील असे,

तिच फक्त नाव जाणून घ्यायची मला फार इच्छा होती,

कस काय माहिती नाही पण,

आम्ही एकमेकांचं नाव न विचारताच बराच वेळ बोललो,

तिकडे दादाच लग्न लागलं,

आणि तिचं नाव माझ्या नावाप्रमाणेच आहे हे समजलं,


फक्त शेवटच अक्षर वेगळं होत,

बाकी सगळं सेम होत,

तेजल होतं तिचं नाव,

माझं नाव तेजस,


गडबड अशी झाली की,

भावाच नाव पण तिच्या तेजस च होतं

ऐकून ते माझं काळीज च धडधडायला लागलं,

वाटलं मायला अजून एक बहीण होतेय की काय आज,

पण नशीब चांगलं माझं तस काही झालं नाही,


नंतर आम्ही भेटलोच नाही,

दुसऱ्या दिवशी ती गेली न सांगता निघून मुंबई ला,

दिवस माझा तो फार सुन्न गेला,

त्या दिवशी मी राधे चित्रपट पाहिला,

माझं मेंदू पासून एक एक अवयव बंद पडला,


संध्याकाळी नदीकाठी गेलो असता,

एक msg req आली,

त्यात तिचा msg आला होता,

म्हणाली photography तुझी लैच भारी,


मनातून मला उकळ्या फुटायला लागल्या,

Msg तिचा आलेला पाहून,

ह्यो तेजस तर पागल च झाला,

त्या दिवसापासून आजवर आम्ही रोज बोलतोय,

तेजस आणि तेजल,

मुंबई पुणे मुंबई वरून रोज आम्ही भांडणं करतो,


पण नेहमी मीच जिंकतो,

आता रोज बोलतोय आम्ही,

कधी कधी फोन पण होतो,

अपूर्ण राहिलेलं बोलणं आता,

पूर्ण करता येईल,

आता लवकरचं भेट आमची भेट होईल,


तेव्हा ती मला फिरवणार आहे मुंबई,

अस म्हणतात मैत्री व्हायला फार वेळ लागत नाही,

तसंच काहीसं झालं आमच्या बाबतीत,

कळलं नाही कधी झाली आमच्यात एवढी दोस्ती,

जाऊदे खूपच बोललो तिच्याबद्दल,


तिला surprise द्यावं या हेतूने लिहिलंय सार काही,

बघूया आता तिला आवडत की नाही,

राव मी तरी काय करणार ना,

शब्दच सारे मनातून आले आहेत,

मनाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही....

मनाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama