STORYMIRROR

Kakade Tejas

Tragedy Inspirational

3  

Kakade Tejas

Tragedy Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
241

आयुष्याकडे पाहायचा दृष्टीकोन बदलला आहे मी

जे आवडतंय ते मला मिळालंच पाहिजे असं काही नाहीये 

तेजस आता पहिल्यासारखा नाहीये

आपल्याला ते आता आवडलंय

पण,

आपल्याला आवडतंय म्हणजे 

आपल्यासारखाच दुसरं कोणीतरी असेल त्याला पण आवडलं असेल

असं मला वाटतं

त्यामुळे न मिळालेल्या 

गोष्टींचं दुःख न करता

आहे त्यात समाधान व्यक्त करायचं ठरवलंय मी

होतंय जग

आपण पण update व्हावं

एका जागी न थांबता

पुढे पुढे जात राहावं

त्यापेक्षा चांगलं काहीतरी आवडेल

आणखी आयुष्य सुंदर बनेल......


माझं आयुष्य म्हणजे काय,

अजून मलाच उमगलं नाही,

काय घडलं माझ्या भूतकाळात,

काहीच मला समजलं नाही,


येत होते बरेच आयुष्यात बरेच लोक,

आपलंसं मानून बसलो त्यांना,

जवळ करून बसलो त्यांना

हीच केली मोठी चूक,


कामापुरता घेतला त्यांनी मला,

नंतर दिलं सोडून एकटं पुन्हा,

तेच तेच होत गेलं आयुष्यात पुन्हा,

लोकांनी ओळखलं होतं मला,

मला कधी ओळखता आलं नाही त्यांना,


त्रास होऊ लागला होता,

या सगळ्या गोष्टींचा,

वाटल होतं संपवावा हा,

आयुष्याचा प्रवास सारा,


अशातच,

माहिती नाही कुठून आली,

एक मशाल आशेची,

म्हणाली मला बघ एकदा जगून स्वतःसाठी,


लागलो करायला प्रयत्न जगायचा स्वतःसाठी,

बदलला दृष्टिकोन आयुष्याकडे पाहण्याचा कायमचा,

यातून दिसू लागली आयुष्याची सुंदरता,

ठरवलं आता असंच जगत राहायचं नेहमी,

विसरुनी सारी दुःख,

मानायचं आहे त्यात समाधान,

आणि नेहमी फक्त खुश राहायचं......

आणि नेहमी फक्त खुश राहायचं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy