STORYMIRROR

Kakade Tejas

Comedy Romance Tragedy

3  

Kakade Tejas

Comedy Romance Tragedy

देवाला मागितलेले प्रेम

देवाला मागितलेले प्रेम

1 min
153

महादेवाच्या देवळात पाया पडलो आम्ही जोडीने,

देवाला म्हटलं हिच्यासोबत च काढायचं आहे आयुष्य गोडीनं,

देव म्हटला,

I have Better Plans For you,

तुला हिच्या पेक्षा चांगली भेटेल नको काळजी करू......


देवाला म्हटलं तुझा जो better plan आहे,

त्यात हिला सुद्धा सामील कर,

हिच्या पेक्षा मला कोणीच चांगली मिळणार नाही,

हिची दुसऱ्या कोणालाच येणारं नाही सर....


देव म्हटला you deserve better,

देवाला म्हटलं तु हिलाच कर better,

आयुष्याच्या प्रवासात याच व्यक्तीची,

हवी आहे मला शेवटपर्यंत साथ सोबत...


मग देव म्हटला खरा तथास्तु,

पण माझं प्रेम आहे तिच्यावर,

हे मी तिला कस सांगू,

मनातलं तिच्यापाशी मी कसं बोलू.....


देवाला म्हटलं कसं रे पेचात टाकलसं तु,

देव म्हटला प्रेमात तु पडलास,

आशीर्वाद मला मागितलासं,

मी म्हटलंय खरं तथास्तु

बघ आता कसं तिला कसं मिळवायचं ते तु...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy