इतकं प्रेम
इतकं प्रेम


इतकं प्रेम
कधी अनुभवलं नाही
ते बाबा तुझ्यामुळं अनुभवतोय
छत्री घरी म्हणून
जरा जास्तच उपभोगतोय
अरे ,किती भिजवायचं..?
जरा थांब की
घरी तरी जाऊ दे...!
थोडी उसंत घेऊ दे...!
बहुतेक ऐकलं वाटतं...
थांबला की रावं
घरी गेलो तर
दारात दुसरं संकट
वाट पहात उभं होतं..
दिसताच क्षणी अंगावर आलं
म्हटलं, निदान येताना
एक लिटर दूध तरी आणायचं....!
आता जा माघारी
सासरचे आत्ताच आलेत...!
म्हटलं पावसाला
लेका नको तेव्हा बरं
तुला ऐकावं वाटत...?
तो हसला
आणि मर लेका म्हणून
बरसू लागला...!