लावणीगीत
लावणीगीत
काय हो दाजीबा
एवढं सजून तुम्ही कुठं चाललं
चाललं ते चाललं मला काईच नाही बोललं
मला बी यायचं हुतं तुम्च्यासंगं
नेताय ना ?
अमेरिका दुबई युरोप जर्मनी
जायाचं कुठं हो फिरायला
कुठं कुठं जाऊया भटकायला !! धृ !!
अहो बोला की दाजी भटकायला
कालच आणल्याती मॅक्सी तीन
जीन्स लेगिन्स मदे सेक्सी दिसीन
काढूया फोटो न दोघांचे सेल्फी
माझा मोबाईल लागलाय तापायला !! १ !!
कुठं कुठं जाऊया भटकायला
गेल्याबी वर्षी न्हेलेच न्हाय
संगतीनं तुमच्या फिरलेच न्हाय
औंदाच्या सुट्टीत रेशमी मिठीत
घेऊन जा तुम्ही मला दाबायला !! २ !!
&
nbsp;कुठं कुठं जाऊया भटकायला
मलेशिया सिंगापूर लै भारी
तिथं बी जायची हाय तय्यारी
खिशात जरा वाढवा वो नोटा
जाऊ परकीय चलन आणायला !! ३ !!
कुठं कुठं जाऊया भटकायला
दिवसभर फिरुया मस्तीनं
घेऊन हात हातात चुस्तीनं
हाटेलात मुक्कामाला दोघंच हाय
बोलवा दाजी मला शीण घालवायला !!४!!
कुठं कुठं जाऊया भटकायला
जवानी माझी भरात हो
घेचाल मला मिठीत हो
धुंदीच्या नशेत माझ्याच संगतीनं
एकांत मिळालाय दोघांनला !! ५ !!
कुठं कुठं जाऊया भटकायला