STORYMIRROR

UMA PATIL

Comedy

4  

UMA PATIL

Comedy

धुंदी दारूड्यांना ( विडंबन )

धुंदी दारूड्यांना ( विडंबन )

1 min
834

मूळ गीत - धुंदी कळ्यांना, चित्रपट - धाकटी बहीण. रचनाकार - जगदीश खेबूडकर


धुंदी दारूड्यांना, धुंदी बेवड्यांना

स्वैररूप आले शिव्या नी शापांना

 


तुझ्या जीवनी जेव्हा आली मदिरा

रंग चढला गप्पांनाही गहिरा

दारूसोबतच लागतो चखणा।।1।।

 


मद्याचा घोट की घोट अमृताचा

मित्रांपुढे हट्ट दारू ढोसण्याचा

पिऊनी तर्र झालास तू उताणा।।2।।

 


शपथ तुझी आमरण पिण्याची

सोड्यासोबतीनेच दारू घेण्याची

निमंत्रण पिण्याचे देतो दोस्तांना।।3।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy