STORYMIRROR

Prashant Shinde

Comedy

3  

Prashant Shinde

Comedy

कणव...!

कणव...!

1 min
28K


स्त्रियांचं बर असत साड्यांची

अदला बदल करता येते

धोतर गेल्यापासून

पुरुषांची खूप पंचाईत होते


सणावारी स्त्रिया नशीबवान

दिवसानुसार रंग ठरवतात

पुरुष मात्र तेच तेच

करडे कपडे घालून मिरवतात


दाग दागिने मौज मजा

कोणतीच त्याची त्यांना नाही सजा

तो जरी असला राजा तरी

हट्टा समोर हात टेकतो होऊन खुजा


हीच किमया त्या विधात्याची

मक्कड बांधून सजविले अन

लगाम दिला स्त्री जातीला

जणू वेसण घालण्या पुरुषाला


आजही देव पावतो नवसाला

स्त्रिया बोलतात नवस सारे

फेडावे लागतात ते पुरुषाला

पण कणव येत नाही त्या देवाला


आता बंड पुकारावे वाटते

झुगारून ते सारे लगाम

बेभान होउनी उधळावे चौखूर

होउनी कायमचे बेफाम

होउनी कायमचे बेफाम....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy