माह्या मोबाईलची डिपी..👀
माह्या मोबाईलची डिपी..👀


माही तं राजेहो निरा
बोबडी वळून राहिली
अन मोबाईलले हात लावताना
धडकी भरून राहिली
निरा माह्या व्हाटसॅपवर
बायको डोळा ठेवून असते
डीपी बदलवला का
भांडण उकरून काढते
एकदा डीपी साठी म्या
दोन गुलाब निवडले ,
बायकोनं माह्या गुलाबाचे
निरा धिंडवडे काढले ...
माह्यासाठी म्हने कधी
गुलाब नाही आठोले
अन डीपी वरचे गुलाब सांगा
तुमी कोनाले पाठोले ...
शेवटी धास्तावुन मी
हात तिले जोडले
अन ...
बायकोचे दोन डोये ...
डीपीवर सोडले...!!!👀🙏😻
विद्या