बाबा ...
बाबा ...
वाटलं होतं ......
वाटलं होतं ह्या अफाट गर्दीमधे ..
एक दिवस .....
एक दिवस अचानक ' बाबा ' पुन्हा भेटेल ....
पुन्हा भेटेल आणि ...
आणि त्याचीही नजर
मलाच शोधत असेल ,
वात्सल्याने भारून ...
अचानक घट्ट हात धरून ...
मायेने पुन्हां थोपटेल
रडवेल्या डोळ्यांनी मी ,
त्याला विचारेन ...
का रुसून गेलास असा
दूर उडून भुर्रकन
का अवेळी गेलास असे
घरटे आपले विस्कटून ...
मनातला सल तुझ्या आठवणींनी
मिटणार नाहीच कधी ...
मी वाट पाहीन त्या दिवसाची
जेव्हा ..
जेव्हा तू पुन्हा उभा राहशील
सावलीसारखा
माझ्या पाठी...
सौ विद्या नितीन देशमुख
