STORYMIRROR

Vidya Deshmukh

Tragedy

3  

Vidya Deshmukh

Tragedy

शरपंजरी

शरपंजरी

1 min
29K


कशी सावरलीस सखे ,

एकटीने .... 

आभाळ होऊन जगताना

मिटत चाललेला चंद्र ,

भाळावर पेलताना

सखे वाट तुझी एकाकी

ऋतू वैरी गं झाले सारे ..

निमूटपणे जगताना जपलेस 

मनांचे देव्हारे 

जगलीस सखे आयुष्य..., शरपंजरी... 

कळा जीवाच्या सोसून

सोसताना ठेवलीस प्राणपणाने 

आशा ज्योत तूं जपून

रिता होत जाई पारिजात

लुटवून सारे श्वास

कातळालाही लाजवणारा 

सखे तुझा आत्मविश्वास

सखे तुझ्या जगण्याचं गीत 

गुणगुणतो दिवस आता 

स्वप्नात भुतकाळातील

गुंतू नकोस आता ...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy