हरीततृष्णा
हरीततृष्णा
कधी कधी वाटतं. सृष्टीचा सारा
हिरवा रंग घ्यावा प्राशून.
एक सुप्त तृष्णा जागतेय मनांत.
चिंब भिजून, मुरत रहावं.
त्याच हिरव्या कोंदणात
साठू द्यावा रोमारोमात तजेला
हिरवाईचा.
वाळवंटातील
वाळूसारखा
खोल खोल
डोळे मिटून
बघत जावं
कुणाकुणाला
वेड लावतेय.
ही, हरीत तृष्णा. एक आभासी
जगच घेईन मग जन्म.
हिरव्या कंच मनामनांचं.
ज्यात कुठेही जागाच नसेल.
मनांच्या विषण्णतेला.
