मृगजळ
मृगजळ
1 min
14.4K
अर्धोन्मिलीत नेत्र
बासरी अधराला
कशी सावरेल राधा
पाहुनी मुरारीला
किती वेड सख्या लावशी
हरपले देहभान
आकंठ नाहवी मज
तव मुरलीची तान
ही प्रित हरीसंगे
चांद्णे शिशीराचे
भावविभोर राधा
झेली वर्षाव अमृताचे
