एकाकी
एकाकी
1 min
13.6K
काजव्यांची रात्र होती
धुंद ती बरसात होती
वाटेवरल्या एकांती
तुझ्या आठवांची साथ होती.
निथळत होता पाऊस
आठवांच्या आसवातून
एकांती भिजवत होता
भावनांच्या कल्लोळातून
चिंब भिजवून रात्रीला
हरवली वाट होती
पावलाच्या सोबतीला
तरंगांची लाट होती
