गाऱ्हाणं
गाऱ्हाणं
1 min
14.4K
विठ्ठला...,
शोभतंय कारे तुला
हे सारं..
युगानुयुगे
कटीवर हात ठेवून
बसलायस
आपलाच हट्ट घेउन
ती रखुमाई ...
तिकडे एकटीच.
स्वतः भक्तांच्या मेळ्यात
स्वीकारतोयस हार
चिक्कार
मंजिऱ्यांचे
हेच कारे वचन
दिलं होतंस तीला?
सात फेरे, सात वचनं
तूही घेतली असशीलच ना रे?
युगानुयुगे अनंत जन्म
सोबत करण्याची
घेतलीच असशील ना रे शपथ?
का नाही काढलास तीचा
रुसवा
विश्वाचं दु:ख
दूर करतोस ना तूं
मग का मिटून
बसलायस डोळे
वामांगीने अशी
किती जन्म प्रतिक्षा
करावी तुझी
एकटीने
