बावरा
बावरा
1 min
28.4K
कावरा बावरा होऊन
नजर
शोध घेतेय
तुझ्या अस्तित्त्वाची
स्वस्तिकातील.
कुंकवाच्या साथीने
मनात ठसणारी
हळद.
आज हरवलीय.
कंच बहरल्या बागेतील
तुळस.
आज सुकलीय.
गोकुळीच्या श्रीरंगाचे
मोरपीस.
कुणी हिरावलय.
मी शोधतोय तुला
वाटेवरल्या प्रत्येक.
चेहरा नसलेल्या
पावलातून.
