STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Fantasy Others

4  

Leena Yeola Deshmukh

Fantasy Others

विठू माऊली

विठू माऊली

1 min
310

दोन वर्षे झाली 

वारी नाही केली 

बघाया माऊली

भक्त आतुरली...||१||


तुझ्याविना आम्हा

नाही करमेना

तुला भेटण्याची

ओढ असे मना...||२||


आषाढी येताच

वारकरी थाट 

पाऊले चालती

पंढरीची वाट....||३||


आज आलो येथे

चंद्रभागा स्नान

दर्शन घेतांना

नाही राहे भान...||४||


तुला बघितले 

हे डोळे भरूनी

ना आस कसली

आता या जीवनी....||५||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy