STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Inspirational Thriller

3  

Leena Yeola Deshmukh

Inspirational Thriller

गड किल्ले संवर्धन

गड किल्ले संवर्धन

2 mins
216

महाराष्ट्र भूमी राजे शिव छत्रपतींची

शान ती स्वराज्याच्या गड किल्ल्यांची

आज काळाची गरज आहे ती मुलांना

शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याची 


छत्रपती शिवाजी महाराज की जय

अशी घोषणा आपण करतो

शिवजयंती उत्सव जल्लोषात,

ढोल ताशांच्या गजरात साजरा करतो !

पण,

महाराज खरचं समजले का?

महाराज आम्ही मानले का?

कसा होता आमचा जाणता राजा?

हे आपण कधी जाणले का ?

गड किल्ले हेची राज्य 

प्रत्येक किल्ल्या मागे दडलंय मावल्यांच शौर्य...

शोभून दिसते माझे स्वराज्य

जाणून घेवू शिवरायांच्या पराक्रमी कथा अन् ऐतिहासीक कार्य ....


शिवेनरी किल्ला शिवजन्म स्थान झाला

स्वराज्याचा निर्माता इथे जन्मला....

लेवून तोरण स्वराज्याचे तोरणा गड सजला

दिमाखात हा सिंधुदुर्ग सागरी उभा राहिला....


महाराजांची स्मारके आम्ही चौक चौकात उभारली

पण खरं सांगा गड किल्ले थोडी तरी सुधारली?


आधी लगीन कोंधण्याच मग लगीन रायबाच

असं म्हणत कोंढाणा सरला...

गड आला पण सिंह गेला

असं माझा राजा त्यावेळी वदला...


जिथे तानाजीने रक्त अन् महाराजांनी अश्रू सांडले...

तेथे आम्ही प्लास्टिक चे कचरे साठवले...


हसत हसत मरणाच्या पालखीत शिवा काशीद सजला...

घोड खिंडीच्या वाटेवर बाजीप्रभू रक्ताने भिजला

एका रात्रीत सात मावळ्या निशी पन्हाळा जिंकला...

या पन्हाळ्यावर आजचे तरुण पिढी नको ते कृत्य करतात...

त्यांच्या नावांचे अक्षरं त्या दांगडांवर कोरतात....


कोण म्हणते चुना आणि शिस ओतून गड किल्ले बांधले....

अरे, इतिहास वाचून बघा इथे प्रत्येक गड मावळ्यांच्या रक्तात न्हाले.....


अफजलखान, शाहिस्तेखान सिध्दी जौहर

अशा कित्येक मात्तबर शत्रूंना महराजांनी तुडवले....

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि गनिमी कावा वापरून

माझ्या राजाने स्वराज्य प्रस्थापित केले....


असा हा माझा महाराष्ट्र घडला 

दगडाला दगड जोडला

माणसाला माणूस जोडला....

तेव्हा स्वराज्याचा गड केला

रयतेचा मावळा झाला

एक एक मावळा या मातीत झिजला

रक्तात भिजला अन् स्वराज्याच्या वेडापायी गडकिल्ल्यांच्या कुशीतच निजला....


असे हे मावळे राहिले नेहमी नेक

तेव्हा झाला रायगडावर राज्यभिषेक...


महराजांचा पदस्पर्श असलेली ही पवित्र गड किल्ले

यावर आम्ही मात्र आता बाजार भरवतोय

या सर्व मावळ्यांचे बलिदान कवडीमोल ठरवतोय...


जसे समुद्रात शिवस्मारक बांधणे महत्वाचे

तसे महाराष्ट्राचे भूषण असलेले गड किल्ले सौरक्षण हेही तितकेच गरजेचे ....

ही ऐतिहासीक पाने मिटू नये महणुन काही प्रतिष्ठान संवर्धनासाठी झटत आहे

तर मग आपणही आज शिव जयंती निमित्त एक संकल्प करू 

आणि 

गड किल्ले हेच खर खुर स्मारक म्हणून जपू 

गड किल्ल्यांचे संवर्धन करू ....


जय शिवराय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational