पप्पा
पप्पा
1 min
197
पप्पा पप्पा करत मी
लहानाची मोठी झाली
तुमच्या मायेची ऊब पप्पा
तुम्ही गेल्यावर जाणवली...१
कुठून आला हा कोरोना
घेऊन गेला आमचा पंचप्राण
अविरत कार्य समाजासाठी
तात्या तुम्ही आहे आमची शान...२
दिवस सरतात, वर्ष सरते
तुमची उणीव सदैव भासते
क्षणा क्षणाला येते आठवण
डोळ्यांची कडा पाणावते...३
जिथे असाल तिथे खुश रहा
टेन्शन आमचे घेऊ नका
पुढल्या जन्मी मी पुन्हा
पप्पा म्हणून मारेल हाका...४
