STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Romance Children

3  

Leena Yeola Deshmukh

Romance Children

एक अवीट गोड नातं मायलेक

एक अवीट गोड नातं मायलेक

1 min
824


माय लेकीचे हे नातं

जसं धान्य अन् जातं

नवमास वाढवूनी गर्भात

जन्माला येते नवखंडाची वात


कळीच होते सुंदर फूल

लेक हळूच टाकते लुटू लुटू पाऊल

घरभर पसरते सुख अन् चैतन्याची चाहूल

अशी बनते माय लेकीच्या नात्याची वीणदार डुल


माय शिकविते पुस्तकातील अक्षर

माय शिकवते तव्यावरची भाकर

माय शिकवते वरिष्ठांचा आदर

मायच असते वात्सल्याचा पदर


माय लेकीच नातं असतं गूढ मैत्रीचं

लेकीसाठी माय देवापुढं वरदान मागते सुखाचं

जगातील सर्वात गोड नातं मायलेकीच्या जोडीच

माय बापाला भाग्य लाभते लेकीच्या कन्यादानाच !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance