मयुरी वाढदिवस
मयुरी वाढदिवस
आज मयुरीची गोष्ट सांगते
मनमोकळी, प्रसन्न, हसरी
युयुवती आहे सुस्वभावी
रीळाप्रमाणे नाते घट्ट बांधणारी !
खूप कमी व्यक्ती आयुष्यात येतात
ज्या आपल्या मनात घर करतात
त्या व्यक्तींपैकी एक गोड मयुरी
मनातील निर्मळता दिसे मुखावरी !
मी मज भाग्यवान समजते
तू माझ्या आयुष्यात येते
नात्याने असलीस जरी नणंद
तरी जवळची मैत्रिण होते !
लाभो निरामय दीर्घायुष्य
पूर्ण होवोत मनोकामना
नेहमी आनंदी ठेव देवा
हिच करते आज प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

