लाजून हसणे
लाजून हसणे
नटून थटून आली
हळूच त्याच्या समोर
नजरेत त्याच्या बघा
तिच्या प्रीतीचा बहर!!
सजने लाजणे
मुली स्त्रियांना जमते
नैसर्गिक देणगी
भुरळ घालते !!
लाजून हसणे आहे
एक कलाकौशल्य
प्रेम जाणकारांना
आहे त्याचे मूल्य !!
तिचे लाजून हसणे
हेच संकेत असते
त्याच्यासाठी तिचे प्रेम
त्याच्या नजरेत भासते !!

