STORYMIRROR

Trupti Naware

Fantasy

3  

Trupti Naware

Fantasy

भिजलेले प्रेम

भिजलेले प्रेम

1 min
238

पानावरच्या शाहीला

एका थेंबाने असे टिपले

मिठीत शब्दांच्या लाजुन

ते पसरुन निळसर हसले

कागदही शहारला लाघवी

मनातल्या त्याच्या मनात

मंद मंद सुगंधात

त्याचे कोरे अंग भिजले

नातं शाहीचं नि कागदाचं

कवीतेला माहीत होतं

शब्द स्वरांनी दोघातले

मधुर अंतर मिटले

शांत ओळीतला आत्मा

सुखावतो हृदयातली स्पंदने

ओठांवरचे गाणे होवुन

भिजलेले प्रेम अंती कळले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy