माळरान
माळरान
प्रत्येकाला वाटते हवेहवेसे
फिरायला हिरवं माळरान |
उन्हाचा बसताच तडाखा
करेल ते शितलता प्रदान | | १ | |
गवताचा मऊशार स्पर्श गोड
त्यांतून फुलपाखरे बागडणारे |
अधुनमधून उमललेली रानफुले
सुगंधित मंद गार वारे वाहणारे | |२| |
माळरानावर खरंतर भटकण्याची
मजाच असते खूप खूप न्यारी |
सोबत हवी खायला लोणचं ठेचा
कांदा अन् भाकरीची न्याहारी | | ३ | |
वृक्षराजींच्या गार सावलीत मस्त
वामकुक्षी घेण्यासाठी निजावे |
दिसताच चिंचा कैरी बोरं आवळे
पाडून हवे तितके मजेत खावे | | ४ | |
