अबोल प्रेम
अबोल प्रेम
हे आपले अबोल प्रेम
असच सुंदर असू दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे...
कधीतरी तुझे हात
माझ्या हाती मिळू दे
अर्थ अधुऱ्या जीवनाचा
तुझ्या सहवासात कळू दे...
मनातले भावनांचे गुपित
शब्दात मला बोलू दे...
प्रेमाची ही सुंदर वाट
तुझ्या सवे चालू दे..

