मन कवीचे...
मन कवीचे...
अचानक कानी शब्द आले
मनच जणू बोलू लागले..
थाटून संवाद अंतर्मनाशी,
मनसोक्त व्यक्त होवू लागले..
व्यथेस शांत हळदी सारखे,
खेळ स्पष्ट खेळू लागले..
भावनांच्या गर्दीत निवांत
स्वसमक्ष साक्ष देऊ लागले..
क्षणाक्षणांत मिसळून रम्य
कल्पनेत वेडे रमू लागले..
शब्दांचे माहेर सजवून
लाडिक ते बागडू लागले..
