Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nandini Menjoge

Abstract Tragedy

3  

Nandini Menjoge

Abstract Tragedy

क्षणात निसटून गेलं!!

क्षणात निसटून गेलं!!

1 min
224

मन गहिवरून आलं आसवांनी भान हरपलं.. 

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

सुख संपत्तीच स्मित मुख्य कसं रुसून गेलं.. 

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

उज्वल अश्या यशाने क्षणात बंड केलं.. 

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

प्रफुल्लित सुगंधित फुल तक्षणी कोमेजून गेलं.. 

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

विश्वास झाला पोरका क्षणात छत्र हरवलं..

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

स्वप्न आकर्षक रंगांचं असंख्य तुकड्यांत तुटलं.. 

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

निष्पाप मनाचं पाखरू वास्तवानं हरखून गेलं.. 

क्षणात होतं सारं काही क्षणात निसटून गेलं ||

Rate this content
Log in