STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract

3  

Nandini Menjoge

Abstract

का?

का?

1 min
192

का नजरेला झुकवावे,

गोंडस खळी ला लपवावे, 


का कोवळी ज्योत विझवावी ,

आत्मजेचा आनंद थांबवावा,


का पाऊल उंबरठ्यात अडकावे, 

कुंपणाच्या सीमेला विश्व समजावे, 


विशाल स्वप्नांनी डोळे मिटावे, 

प्रगतीने कायम मौन पाळावे,


भान विसरण्याचा आजार हा वाढतच चाललाय, 

परिथिती ला साक्ष देत काळ पुढे चाललाय... 


संस्कारांचा प्रकाशमार्ग काळ्या ढगांनी अडवलाय... 

नको नको त्या ग्रहणांनी तनयेला ग्रासलंय... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract