STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Abstract

3  

Ramkrishna Nagargoje

Abstract

क्षितिज

क्षितिज

1 min
400

निळे निळे आकाश,

क्षितिजाशी मिळाले,

भेट घेण्या तुझी,

मन माझे धावले.


क्षितिजा जवळ येता,

अजुन क्षितिज पूढे,

हिरव्या पर्वतावर,

फुले आणि झाडे.


पक्षी मधूर गाती,

गाणे पूढे,पूढे,

अजुन पूढे जाता,

क्षितिज पूढे पूढे.


वाहते नदी तेथे,

आहेस,का तू बरे,?

नदीजवळ येता,

उंच उडती पाखरे.


हिरव्या गवतावर,

दवबिंदू आले,

क्षणभर थांबून,

बघ निघून गेले.


कसे शोधू तुला,

सांग एकदा बरे,

पूढे पूढे येता,

क्षितिज अजुन पूढे.


आस आहे मनी,

तुला भेटण्याची,

त्या. तिथे येता,

सारा अभास आहे.


सुर्य आला अस्ताला,

किती दूर आलो,

थांबतो थोडा येथे,

पून्हा प्रभात आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract