हाय बाय बोलू या, शाळेत आपण जाऊ
हाय बाय बोलू या, शाळेत आपण जाऊ

1 min

25.4K
हाय बाय बोलू या,
शाळेत आपण जाऊया.
भरली शाळा घंटी वाजे,
अंतर राखणे धडे नवे.
सेनिटायझर वापरा थोडे,थोडे
हात हाताशी,नको बरे.
मास्क वापरा चला पुढे,
घ्या संसर्गाचे धडे बरे,
आपला वर्ग छान बरे,
भिंतीवर चित्र नवे नवे.
शिक्षण घेऊ आपण सारे,
कोवीड १९, ज्ञान बरे,
आवश्यक विषय आला पुढे.
ज्ञान त्याचे घ्या सारे.
असेच आपण शिकुया,
नविन धडे घेऊया,
हाय,बाय बोलूया,
शाळेत आपण जाऊया.
असेच आपण राहूया.